प्रमोद देशपांडे - लेख सूची

बेधुंद शहरीकरण, मातीचे मरण आणि वंचितांचे मूक आक्रंदन

सद्यःस्थितीत मानव आणि निसर्गातील मानवेतर घटक ह्यांच्यातील सहजीवन गंभीर संकटात सापडले आहे. मानवाने स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठी निर्माण केलेली साधने आता त्याच्याच अस्तित्वावर उलटत आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर समाजशास्त्राचे ज्येष्ठ विचारवंत अँथनी गिडन्स ह्यांनी आधुनिक समाजाचे वर्णन ‘जोखीमयुक्त समाज’ (Risk Society) असे केले आहे. तीव्र आर्थिक स्पर्धा आणि पारंपरिक सामाजिक संरचना एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या भारतासारख्या विकसनशील …

चार्वाक — तर्काचा बंडखोर

नाकारले वेदांचे प्रामाण्य तर्काचा तो बंडखोर—चार्वाक इंद्रियप्रत्यक्ष सत्य मानले अनुमान-आगम बुद्धीचे खेळ   ईश्वर नाही, आत्मा नाही परलोकही केवळ कल्पना “यावज्जीवं सुखं जीवेत” विवेकातून आनंदाचा झरा   चार महाभूतांचा संगम चैतन्य म्हणजे देहाचा योग सृष्टी स्वाभाविक, ईश्वर नाही भौतिकतेतच जीवनाचा भोग   नाही पाप, नाही पुण्य नाही पुनर्जन्माचा व्यापार जगणे म्हणजे अनुभवांचा उत्सव नैतिकतेचा स्वाभाविक आधार   आज विज्ञानाचे …

लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

१९ एप्रिल ते १ जून २०२४ ह्या कालावधीत सात टप्प्यांमध्ये ५४३ मतदारसंघात झालेली सर्वांत मोठ्या लोकशाही देशाची जगातील सर्वांत मोठी निवडणूक पार पडून स्वतंत्र भारताची अठरावी लोकसभा नुकतीच स्थापित झाली आहे. निकालानंतर उडणारा गुलाल असो वा धुराळा यथावकाश दोन्ही खाली बसेल. फैजच्या शब्दांत सांगायचे झाल्यास “तुझ से भी दिल-फ़रेब हैं ग़म रोज़गार के” (तुझ्याहूनही माझ्या …